06 August 2020

News Flash

Coronavirus : करोनाचा विळखा आणखी घट्ट

एकूण बाधितांची संख्या २,२३७; ८२ नवीन बाधितांची भर

(संग्रहित छायाचित्र)

एकूण बाधितांची संख्या २,२३७; ८२ नवीन बाधितांची भर

नागपूर : उपराजधानीत नवीन करोना बाधित  मोठय़ा संख्येने आढळण्याचा प्रकार शनिवारीही कायम होता. २४ तासात शहरात आणखी ८२ नवीन बाधितांची भर पडली.  त्यामुळे  एकूण रुग्णांची संख्या थेट २,२३७ वर पोहचली आहे. यापैकी ६५.७ टक्क्यांहून अधिक रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

शहरात आढळलेल्या नवीन बाधितांमध्ये वाडीतील ९ , दाभा १, कोंढाळी १, सराफ चेंबर परिसर ८, मध्यवर्ती कारागृह ३, न्यु कॉलनी १, दिघोरी १, अन्य परिसरातील ४, सावनेर १, हिंगणा १, कामठी  ५, राजनगर विलगीकरण केंद्रातील १ आणि इतरही भागातील रुग्णांचा समावेश आहे.  नवीन बाधितांपैकी बरेच व्यक्ती विलगीकरण केंद्रातील असल्याने संक्रमनाचा धोका कमी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरात चार महिन्यात मेयो, मेडिकल, एम्स, नीरी, माफसू, लता मंगेशकर तसेच दोन खासगी प्रयोगशाळेतून तीस हजार चाचण्या झाल्या. नागपूरपेक्षा कोल्हापूर अतिशय लहान आहे, परंतु येथे नागपूरपेक्षा जास्त  चाचण्या करण्यात आल्या आहेत. अलिकडे रॅपिड चाचणी सुरू करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. शहरातील चाचण्यांचा आकडा ३० हजारांवर पोहचला असून यातील सर्वाधिक चाचण्या मेयोत झाल्या आहेत.

नवीन आठ परिसर प्रतिबंधित

करोना  रुग्ण असलेले नवीन आठ परिसर आज शनिवारी प्रतिबंधित करण्यात आले. यात हनुमानगर झोनतंर्गत दुबे नगर हुडकेश्वर, लक्ष्मीनगर झोनमध्ये हिंगणा मार्गावर एसबीआय कॉलनी, धरमपेठ झोनतंर्गत कुंभार टोळी (झोपडपट्टी) हॅम्पर्ड रोड, लक्ष्मीनगर झोनमध्ये जयताळा बौद्ध विहाराजवळ , लकडगंज झोनमध्ये ओम अपार्टमेंट, सूर्यनगर, आनंद चौबे हायस्कूलजवळ, गांधीबाग झोन परिसरात नबाबपुरा ढोबळे गल्ली, मुंजे सभागृहाजवळ, लकडगंज झोनतंर्गत डिप्डी सिग्नल परिसरात वक्रतुंड अपार्टमेंट परिसराचा समावेश आहे.

मेयो रुग्णालयातून सर्वाधिक करोनामुक्त

करोनाबाधितांवर मेयो रुग्णालयात अतिशय चांगल्या पद्धतीने  उपचार होत आहे. त्यामुळे येथे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मेयोतून सुमारे ६६४ जण करोनामुक्त झाले. साथ आजारांबाबत मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून उत्तम व्यवस्थापन सुरू असल्याने येथूनही ६२९ जण करोनामुक्त झाले. एम्समधून १४२ करोनामुक्त झाले.

सक्रिय बाधितांची संख्या ७३३ वर

नागपूरात प्रथमच सक्रिय बाधितांची संख्या  ७३३ वर पोहचली आहे. यापैकी सर्वाधिक २१५ बाधित मध्यवर्ती कारागृहातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये आहेत. त्यानंतर १४१ बाधित मेडिकलमध्ये, १२३ बाधित आमदार निवासातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये, ८० बाधित मेयोत, ५५ बाधित एम्समध्ये, ३१ बाधित कामठीतील रुग्णालयात, २४ रुग्ण खासगी रुग्णालयात तर ६४ रुग्ण दाखल करण्याच्या प्रक्रियेत होते.  आमदार निवासातील कोव्हिड केअर सेंटरमधून आजपर्यंत २४ जण  करोनामुक्त झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 5:58 am

Web Title: coronavirus in nagpur 82 fresh cases of coronavirus in nagpur
टॅग Coronavirus
Next Stories
1 मंगेश कडवविरुद्ध सहावा गुन्हा दाखल
2 सलून सुरू, तरी नाभिकांवरचे संकट कायम
3 ‘स्मार्ट सिटी’चा वाद आता न्यायालयात!
Just Now!
X