कठोर उपाययोजनांचा चांगला परिणाम

नागपूर : औषध दुकानातून विक्रीवर निर्बंध घातल्याने तसेच खासगी दवाखान्यात होणारा अवाजवी वापर कमी के ल्याने  रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने के ला आहे. पुढच्या टप्प्यात अशाचप्रकारे आणीबाणीच्या काळात होणारी आक्सिजनची टंचाई दूर करण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त के ला आहे.

करोनाची साथ जोरावर असताना अचानक बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. चार हजार रुपयांचे इंजेक्शन पंचवीस हजार रुपयांना विकले जात होते. अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे मोठय़ा संख्येने साठवणूक के ली होती व त्यांच्या दवाखान्यातील सामान्य रुग्णांना दररोज चार ते पाच इंजेक्शन टोचले जात होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व प्रशासन खात्याचे मंत्री यांनी खासगी दवाखान्यात इंजेक्शनचा अवाजवी वापर होत असल्याचा आरोप के ला होता. मात्र कारवाई कोणाच्याच विरोधात के ली जात नव्हती. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महामारी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचा वापर करून रेमडेसिवीर इंजेक्शन गरजूंना किफायतशीर दरात मिळावे म्हणून त्याची बाजारातील विक्री बंद के ली आणि कोविड रुग्णालयातून पुरवठा सुरू के ला. रुग्णालयांनाही आयसीएमआरच्या उपचार पद्धतीनुसारच इंजेक्शनचा वापर करण्याचे बंधन घातले.

खासगी रुग्णालयातील औषध दुकानातूनही इंजेक्शन खरेदी करणाऱ्यांना आधार कार्ड व डॉक्टरांची चिठ्ठी देण्याची सक्ती के ली, खुद्द जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गांधीबागेतील काही दुकानांची आकस्मिक तपासणी के ली व त्यांच्याकडील इंजेक्शनच्या साठय़ाची व विक्रीची माहिती घेतली. एकीकडे अवाजवी वापरावर निर्बंध व दुसरीकडे पुरवठय़ाकडे लक्ष यामुळे बाजारातील इंजेक्शनचा काळाबाजार कमी झाला. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला डॉक्टरांची संघटना आयएमए व खासगी दवाखान्यांची संघटना विदर्भ हास्पिटल असो.ने पाठिंबा दिला. मात्र औषध विक्रे त्यांनी याला विरोध के ला होता.  मात्र तो मोडित काढून प्रशासनाने त्यांचा निर्णय सक्तीने राबवला. त्यामुळे सध्या गरजूंना वाजवी किं मतीत इंजेक्शन उपलब्ध होत आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क  साधला असता त्यांनी  काळाबाजार थांबवण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. त्याचा  सर्वसामान्यांना फायदा होत आहे. अशाच पद्धतीने ऑक्सिजनचाही गैरवापर थांबवून त्याचा साठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न पुढच्या काळात करण्यात येणार आहे. करोनाच्या नावाखाली अनेक क्षेत्रात सर्वसामान्य रुग्णांची लूट के ली जात असून त्यात वैद्यकीय क्षेत्र अपवाद नाही, रेमडेसिवीर व ऑक्सिजनची टंचााई हा त्यातलाच प्रकार असल्याचा आरोप यापूर्वीही झाला. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण ठरते.

ऑक्सिजन पुरवठय़ासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

करोना संसर्ग उपचार पद्धतीमध्ये बाधितांना मोठय़ा प्रमाणात द्रव व ऑक्सिजनची गरज असून त्याचा सुरळीत, सुलभ व सहज पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा स्तरावर दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या जगदंबा  एअर प्रोडक्शन, विदर्भ एअर प्रोडक्शन या दोन  कंपन्यांसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी नंदू उईके हे काम पाहतील  तर ऑयनॉक्स एअर प्रोडक्शन बुटीबोरी, मोहॉक्सी इंडस्ट्रीज हिंगणा या दोन कंपन्यांची तपासणी वनपरिक्षेत्र अधिकारी कांतेश्वर बोलके करतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.