News Flash

महिला डॉक्टरवर रुग्णालयातच अत्याचाराचा प्रयत्न

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरला अटक केली.

संग्रहित छायाचित्र

सहकारी डॉक्टरचे कृत्य

नागपूर : शारीरिक संबंधास नकार दिल्यानंतर सहकारी डॉक्टरने रुग्णालयातच महिला डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न केला. ही घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गतएका रुग्णालयांतर्गत उघडकीस आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरला अटक केली.डॉ. नंदू रहांगडाले (३९) रा. ट्रस्ट लेआऊट , हिलटॉप, अंबाझरी, असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे.

या रुग्णालयात कोविड केअर सेंटर आहे. पीडित २४ वर्षीय महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात  कामाला लागली. तेव्हापासून नंदूची वाईट नजर महिला डॉक्टरवर होती. सोमवारी रात्री महिला डॉक्टर खोलीत होती. नंदू तेथे आला व त्याने पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. पीडितेने नकार देताच आरोपी तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. तिने विरोध केला असता तो बळजबरी करू लागला. महिला डॉक्टरने त्याला धक्का दिला. ती बाहेर आली. मानकापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी नंदूला अटक केली. यापूर्वी अजनी परिसरातील एका आरोग्य आणि निसर्गउपचार केंद्रात डॉक्टर सुनील वरघसे (४०) याने हॉस्पिटलमध्येच १९ वर्षीय परिचारिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. एक आठवडय़ातील डॉक्टरने अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:11 am

Web Title: doctor tried to rape a female doctor in the hospital zws 70
Next Stories
1 “संकट गंभीर, सगळ्यांनी संवेदनशीलता दाखवायला हवी”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आवाहन!
2 शासकीय रुग्णालयांत प्राणवायू प्रकल्प
3 प्राणवायू पुरवठा बंद केल्याने उत्पादनात घट
Just Now!
X