News Flash

डॉ. श्रीपाद जोशी मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष

कार्यवाह म्हणून डॉ. इंद्रजित ओरके आणि कोषाध्यक्ष म्हणून डॉ. विलास देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष कवी आणि समीक्षक डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर कार्यवाह म्हणून डॉ. इंद्रजित ओरके आणि कोषाध्यक्ष म्हणून डॉ. विलास देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली.
पुण्यातील महामंडळाचा कार्यकाळ ३१ मार्चला संपल्यावर अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपुरात विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य संकुलात आल्याची अधिकृत घोषणा महामंडळाचे माजी कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी केली. महामंडळाच्या पहिल्या बैठकीत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे नाव अध्यक्षपदासाठी मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सुचविले व त्याला चंद्रशेखर गोखले यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष म्हणून भोपाळचे सुधाकर भाले, तर कार्यवाह म्हणून डॉ. इंद्रजित ओरके आणि कोषाध्यक्षपदी डॉ. विलास देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 2:09 am

Web Title: dr shripad joshi
Next Stories
1 उड्डाणपूल ठरताहेत अपघातांची केंद्रे!
2 ‘ग्लॅमर’मध्ये ‘शॉर्टकट’ नको !’ लोपामुद्रा राऊतचे मत
3 हेल्मेट सक्तीवर गृह सचिव, पोलीस आयुक्तांना उच्च न्यायालयाची नोटीस
Just Now!
X