News Flash

राँग नंबरने प्रेमाची सुरुवात, ती त्याच्यापेक्षा १० वर्षाने मोठी पण प्रेमाचा शेवट धक्कादायक

मागच्या अडीच वर्षात त्यांच्यात जवळीक वाढली होती.

प्रेमसंबंध कायम ठेवायला नकार दिला म्हणून एका युवकाने प्रेयसीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. नागपूरच्या राजेंद्र नगर चौकात मंगळवारी ही घटना घडली. प्रेयसी या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कस जुळलं प्रेम ?
आरोपी युवक आणि तरुणीच्या वयामध्ये तब्बल १० वर्षांच अंतर आहे. एका राँग नंबरच्या फोन कॉलवरुन त्यांची मैत्री झाली. सोशल मीडियावर त्यांच नातं आणखी बहरलं. मागच्या अडीच वर्षात त्यांच्यात जवळीक वाढली होती. प्रेमाच्या या नात्यात आरोपीपेक्षा प्रेयसी १० वर्षांनी मोठी होती.

ब्रेकअप का झाला?
जखमी तरुणीला एक मोठी बहिण आहे. तिचं लग्न झालं आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. कुटुंबीय जखमी तरुणीच्या लग्नाचं बघत होते. आहे. त्यामुळे तरुणीने आरोपी सोबतचे प्रेमसंबंध तोडले. पण आरोपीला ते मान्य नव्हते. प्रेयसी प्रेमसंबंध कायम ठेवायला तयार नाही, त्या रागातून आरोपीने हा जीवघेणा हल्ला केला. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

कसा केला हल्ला?
जखमी महिला एका रुग्णालयात नोकरी करते. आरोपी गोंदियाचा राहाणार आहे. तो मंगळवारी सकाळी शहरात आला. तो गोंदियाहून ट्रकने नागपूरला आला. पार्डीच्या एचबी टाऊनजवळ तो ट्रकमधून उतरला. महिला ज्या रुग्णालयामध्ये काम करते, तिथे तो गेला. तरुणीने रुग्णालयाच्या एका रक्तदान शिबीरासाठी गेली होती. त्यामुळे आरोपी तिथे वाट पाहता थांबला.

तरुणी रुग्णालयाच्या दिशेने येताना दिसताच, त्याने तिचा पाठलाग सुरु केला. त्याने स्वत:सोबत धारदार शस्त्र आणले होते. जीवाच्या भीतीने पळताना तरुणी त्याच भागातील दुसऱ्या एका रुग्णालयात शिरली. आरोपीने तिथे घुसून तिच्यावर वार केले. तरुणी जागीच कोसळली. तिच्या डोक्याच्या भागाला गंभीर मार लागला आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना घडत असताना प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला पकडून चोपले व नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 5:05 pm

Web Title: ex boyfriend stabs woman with sharp weapon for saying no to continue relationship dmp 82
Next Stories
1 राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याकडे दुर्लक्ष
2 ‘एसटी’कडे पैसे भरल्यावरही अनेकजण स्मार्टकार्डपासून वंचित!
3 करोना लसीकरणाचे महापालिकेसमोर आव्हान
Just Now!
X