विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. एका पुरुष रुग्णाचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकही रुग्ण नसल्याने चंद्रपूर ग्रीन की, ऑरेंज झोन अशा वादात अडकले होते.
आज एक पुरुष रुग्ण सापडला आहे. त्याला विलगिकरण कक्षात ठेवले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. या पुरुषाचा करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ एस. एस. मोरे यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2020 9:27 pm