पहिल्या टप्प्यात राज्यात ५,२९७ पोलिसांची भरती प्रक्रिया  पूर्ण केली जाईल. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात ७,५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तसेच अतिरिक्त काही जागांना मंजुरी  प्राप्त झाली आहे. ही पदभरती तिसऱ्या टप्प्यात केली जाईल. अशी एकूण १२,५०० पदांवर पोलीस भरती होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात दिली.

बेरोजगारी वाढत असताना राज्य सरकार पोलीस भरती पुढे ढकलत आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नागपुरातील आकाशवाणी चौकात सोमवारी निदर्शने केली.

पोलीस दलातील १२ हजार पदांची भरतीप्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यास निघाले. ही माहिती कळताच गृहमंत्र्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. या चर्चेत त्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना  भरतीबाबत माहिती दिली. गृहमंत्र्यांनी हीच माहिती संध्याकाळी व्टिटरवर जाहीर केली.