चंद्रशेखर बोबडे

रुग्णालयातील खाटांच्या टंचाईमुळे रुग्णांना दाखल करून घेण्याच्या वेळेत वाढ झाल्याने रुग्णवाहिकांमधून येणाऱ्या रुग्णांच्या प्राणवायू पुरवठ्यात पाच पटींहून अधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोनाबाधितांना रुग्णालयात नेताना खाटा उपलब्ध असल्याची खात्री के ली जात आहे.

आपत्कालीन स्थितीत तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्रात राज्य  शासनाने नि:शुल्क रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली आहे. १०८ क्रमांकावर दूरध्वनी केल्यास सरासरी २० मिनिटांच्या आत सर्व वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांसह रुग्णवाहिका मदतीला येते. करोनाकाळात विशेषत: करोनाच्या दुसऱ्या लाटेत या रुग्णवाहिके च्या माध्यमातून अनेकांना तातडीने रुग्णालयात दाखल होणे शक्य झाले. रुग्णवाहिका इस्पितळाच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर साधारणपणे दहा मिनिटात रुग्णवाहिके तील रुग्णाला इस्पितळात दाखल करून घेतले जाते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र चित्र वेगळे आहे. सर्वच प्रकारच्या कोविड रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याने रुग्णवाहिकांना तासन्तास रुग्णालयाच्या प्रांगणातच खाट उपलब्धतेची वाट पाहात ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे या काळात रुग्णाचा प्राणवायूचा पुरवठा सुरूच असतो. त्यामुळे प्राणवायूच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

खाटा मिळायला विलंब होत असल्याने तसेच करोनाबाधितांना घरापासूनच नियमित प्राणवायूचा पुरवठा करावा लागत असल्याने करोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवशी एका रुग्णवाहिके चा प्राणवायूचा वापर ५.३ पटीने वाढला आहे, असे  १०८ क्रमांकाच्या (महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा) रुग्णवाहिकेचे संचालन करणाऱ्या कं पनीचे पूर्व महाराष्ट्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपककु मार उके  यांनी सांगितले. ते म्हणाले, करोनाच्या दुसऱ्या लाटेत ही बाब प्रकर्षाने जाणवते. ३१ मार्चपर्यंत नागपूर विभागातील ७० हजार ९३ करोना रुग्णांनी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला. ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटरपासून ते शहरांतील प्रमुख रुग्णालयापर्यंत रुग्णांना हलवण्याचे कामही याच रुग्णवाहिके च्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार के ले जाते.

रुग्णालयातील खाटांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही वेगळे बदल के ले आहेत. रुग्णवाहिके साठी दूरध्वनी आल्यास व तो करोनाबाधितांशी संबंधित असल्यास आम्ही त्यांना प्रथम खाट उपलब्ध झाली की नाही, खात्री करून घेतो. खाट मिळाली नसेल तर त्यांना महापालिका किं वा इतर संबंधित हेल्पलाइन्सचे नंबर देऊन मदत करतो. काही काळाने पुन्हा फोन करून खाट मिळाली किं वा नाही याचा आढावा घेतो. खाट मिळाली असेल तर आमची रुग्णवाहिका त्यांच्या मदतीला पाठवतो, असे डॉ. उके  म्हणाले.