News Flash

नागपूरमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेची आत्महत्या; “आई मला माफ कर” होते शेवटचे शब्द

मारोडी येथे राहणाऱ्या बलात्कार पीडित तरुणीचे बीएडपर्यंतचे शिक्षण झाले असून तिचे मयूरशी प्रेमसंबंध होते. श्याम हा मयूरचा मित्र असल्याने ती श्यामला ओळखत होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर जिल्ह्यातील मौद्यातील मारोडी येथे सामूहिक बलात्कार पीडित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली. प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे. घटनेनंतर निर्माण झालेला तणाव पाहता पोलिसांनी आरोपींच्या घराबाहेरही बंदोबस्त ठेवला आहे.

मारोडी येथे राहणाऱ्या बलात्कार पीडित तरुणीचे बीएडपर्यंतचे शिक्षण झाले असून तिचे मयूरशी प्रेमसंबंध होते. श्याम हा मयूरचा मित्र असल्याने ती श्यामला ओळखत होती. शुक्रवारी रात्री श्यामने तिला मारोडी बसस्थानकाजवळ भेटायला बोलावले. श्यामने तिला काही अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी नेले. तिथे एका टपरीच्या मागे मयूर, राहुल आणि अल्पवयीन आरोपी हे तिघे आधीपासूनच थांबले होते. त्यांनी पीडित मुलीला बळजबरीने दारु पाजली आणि यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

अत्याचारानंतर नराधम तिला दुचाकीवरुन दुसरीकडे घेऊन जात होते. यादरम्यान तरुणीने प्रतिकार केल्याने नराधमांनी पीडितेला पुलावर सोडून पळ काढला.घरी परतल्यावर पीडितेने आईला आणि भावाला घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले व नराधमांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक देखील केली.

रविवारी दुपारी पीडित मुलगी घरात एकटीच होती. यादरम्यान पीडितेने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. “आई मला माफ कर, मी तुझे म्हणणे ऐकायला पाहिजे होते, माझ्या हातून चूक झाली असून यासाठी मयूरच जबाबदार आहे. अन्य तिघांचा या घटनेशी संबंध नाही”, असे पीडितेने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 3:23 pm

Web Title: gang rape victim commits suicide in 3 arrested in mauda
Next Stories
1 भालचंद्र नेमाडे अनीतीवादी आणि संधीसाधू!
2 मुलगा तापाने फणफणत असतानाही कर्तव्यावर निघाले होते संजय राजपूत!
3 यंत्रणा राबवूनही मेट्रो कामांची पूर्तता अवघड
Just Now!
X