रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी अडीच हजारांची मागणी

नागपूर :  करोनामुळे संपूर्ण शहर भयग्रस्त झाले असताना दुसरीकडे काहींनी या स्थितीलाही व्यावसायिक संधी मानून गरजूंची लूट करणे सुरू के ले आहे. खासगी रुग्णालयात उपचाराप्रमाणेच तेथील शववाहिकांची सेवाही महागली आहे. रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीवर नेण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये आकारले जात आहेत.

शहरात शंभरपेक्षा जास्त खाजगी रुग्णालयात करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसात  करोना  मृत्यूची संख्या वाढली आहे. यातील बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असतात. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर मृतदेह स्मशानभूमीत  नेण्यासाठी इस्पितळातूनच  शववाहिका दिली जाते. मात्र त्याचे दर आता कमालीचे वाढले आहेत. अनेकांनी  रुग्णवाहिके ला शववाहिके त रूपांतरित के ले आहे. पूर्व नागपुरातील एका मोठय़ा रुग्णालयात शुक्रवारी एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी शववाहिकेची मागणी केली. रुग्णालय ते घाट केवळ अर्धा किमी अंतर  आहे. यासाठी १५०० रुपयांची मागणी करण्यात आली. अनेक ठिकाणी दोन हजार ते तीन हजार रुपये घेतले जातात. अंतर कितीही कमी असले तरी दर तेवढेच घेतले जातात.

महापालिके कडून नि:शुल्क शवाहिके ची सेवा दिली जाते. एकूण १६ शववाहिका आहेत.  शहरातील दहा झोनमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे शववाहिकांची व्यवस्था केली आहे. शिवाय सहा शववाहिका सिव्हिल लाईन कार्यालयात आणि १० शववाहिका या खाजगी संस्थेच्या आहेत. याउपरही खासगी शववाहिका आहेत. परंतु, करोना मृत्यूसंख्या रोज वाढत असल्याने शववाहिकांची मागणीही वाढली आहे. महापालिके च्या शववाहिका तातडीने मिळत नसल्याने खासगीची मागणी होते. मात्र ते अव्वाच्या सव्वा दर आकारून गरजूंची  लूट करीत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे यावर नियंत्रण  नाही. जिवंतपणी उपाचारासाठी लाखो रुपयाची देयके देत खाजगी रुग्णालयाकडून आधीच लूट सुरू असताना आता मृत्यूनंतर काही रुग्णालयांनी दलालांमार्फत खाजगी शववाहिकांद्वारे पैसा कमावणे सुरू केले आहे.

तक्रार आल्यास कारवाई करू

महापालिकेच्या १६  व  खाजगी संस्थांच्या १० अशा २६ शववाहिकांच्या माध्यमातून शहरात नि:शुल्क सेवा  दिली जाते. खाजगी रुग्णालय शववाहिकेसाठी अधिक  पैसे घेत असतील व त्या संदर्भात तक्रारी आल्यास रुग्णालयावर कारवाई के ली जाईल. शववाहिकेसाठी नागरिकांनी महापालिकेच्या झोन कार्यालयात किंवा महापालिकेच्या अ‍ॅपवर कळवावे.

– डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी, महापालिका.