राज्यात ज्येष्ठांमध्ये २४ सप्टेंबर २०२० रोजीच्या तुलनेत ४ मार्च २०२१ रोजी करोना संक्रमणाचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून दिसत आहे. वयाची पन्नासी ओलांडलेल्यांमध्ये हे प्रमाण वाढले आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाकडून रोज सार्वजनिक आरोग्य विभागासह इतर स्रोतांकडून करोनाशी संबंधित माहिती घेत त्याचे विश्लेषणात्मक अहवाल तयार केला जातो. या अहवालानुसार २४ सप्टेंबर २०२० पर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण करोना बाधितांपैकी ० ते १० वयोगटातील ३.७८ टक्के, ११ ते २० वयोगटातील ६.९५ टक्के, २१ ते ३० वयोगटातील १७.११ टक्के रुग्ण होते. तर ३१ ते ४० वयोगटातील २१.३३ टक्के, ४१ ते ५० वयोगटातील १७.९० टक्के, ५१ ते ६० वयोगटातील १५.९२ टक्के, ६१ ते ७० वयोगटातील १०.५३ टक्के, ७१ ते ८० वयोगटातील ४.९४ टक्के, ८१ ते ९० वयोगटातील १.३८ टक्के, ९१ ते १०० वयोगटातील ०.१७ टक्के रुग्णांना करोना झाला होता.

दरम्यान, ४ मार्च २०२१ रोजीच्या अहवालानुसार ० ते १० वयोगटातील ३.३२ टक्के, ११ ते २० वयोगटातील ६.६२ टक्के, २१ ते ३० वयोगटातील १६.४२ टक्के रुग्ण होते. तर ३१ ते ४० वयोगटातील २१.०० टक्के, ४१ ते ५० वयोगटातील १७.९९ टक्के, ५१ ते ६० वयोगटातील १६.३४ टक्के, ६१ ते ७० वयोगटातील ११.१८ टक्के, ७१ ते ८० वयोगटातील ५.३९ टक्के, ८१ ते ९० वयोगटातील १.५३ टक्के, ९१ ते १०० वयोगटातील ०.१९ टक्के रुग्णांना करोना होता.

त्यामुळे दोन्ही अहवालांची तुलनात केल्यास ० ते १०, ११ ते २०, २१ ते ३०, ३१ ते ४० या वयोगटांमध्ये बाधितांचे प्रमाण सप्टेंबर २०२० च्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये कमी झालेले दिसत आहे. तर ४१ ते ५०, ५० ते ६०, ६१ ते ७०, ७१ ते ८०, ८१ ते ९०, ९१ ते १०० या वयोगटात मात्र पूर्वीच्या तुलनेत प्रमाण वाढलेले दिसत आहे.

करोनाबाधितांचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)

वयोगट           २४ सप्टें. २०      ४ मार्च २१

४१ ते ५०         १७.९०             १७.९९

५१ ते ६०         १५.९२             १६.३४

६१ ते ७०         १०.५३             ११.१८

७१ ते ८०         ०४.९४             ०५.३९

८१ ते ९०         ०१.३८             ०१.५३

९१ ते १००       ००.१७             ००.१९