News Flash

नागपूरमधील ‘हल्दीराम’ रेस्टॉरंटच्या सांबारमध्ये मृत पाल

मेदूवड्यासोबतच्या सांबारमध्ये पालीचे मृत पिल्लू होते.

सांबारमुळे अग्निहोत्री यांच्या कुटुंबातील दोघांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले.

नागपूर येथील ‘हल्दीराम’ रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थात मृत पाल आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजनी चौकातील हल्दीरामच्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला असून मेदूवड्यासोबतच्या सांबारमध्ये पालीचे मृत पिल्लू आढळलं आहे.

नागपूरमध्ये ‘हल्दीराम’ या ख्यातनाम कंपनीचे रेस्टॉरंट देखील आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार वर्धा येथे राहणारे यश अग्निहोत्री हे नुकतेच नागपूरमध्ये गेले होते. यश अग्निहोत्रींसोबत त्यांचे कुटुंबीय देखील होते. यश अग्निहोत्री यांनी ‘हल्दीराम’च्या रेस्टॉरंटमध्ये मेदूवडा मागवला होता. मेदूवड्यासोबतच्या सांबारमध्ये पालीचे मृत पिल्लू होते. हा प्रकार अग्निहोत्री यांनी मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला आहे. सांबारमुळे अग्निहोत्री यांच्या कुटुंबातील दोघांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

यश अग्निहोत्री यांनी या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) तक्रार दिली आहे. अग्निहोत्री यांनी पुरावा म्हणून छायाचित्र तसेच खाद्यपदार्थाचे बिलही सादर केले आहेत. एफडीएने आता याप्रकरणाची चौकशी सुरु केली असून हल्दीरामवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 9:43 am

Web Title: lizard found in sambar at haldiram restaurant fda begins probe
Next Stories
1 कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीतील घोळ संपणार
2 भ्रष्टाचार दडपण्यासाठी अधिकाऱ्याकडे खंडणी मागितली
3 परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांची तप्त उन्हामुळे गैरसोय
Just Now!
X