News Flash

लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

आगीचे प्रमुख कारण गोदामांच्या देखभाल-दुरुस्तीचे समोर येत आहे.

देशाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे भांडाराशेजारी राष्ट्रांच्या मारा करण्याच्या टप्प्यात नाही. स्वातंत्र्यानंतर संरक्षण उपकरणे आणि शस्त्रात्र निर्मितीसाठी मध्यभारताची निवड करण्यात आली. त्यानुसार वर्धा जिल्ह्य़ातील पुलगावला देशातील सर्वात मोठे दारूगोळा भांडार उभारण्यात आले, त्यामुळे मोठी सुरक्षा व्यवस्था असतानाही या लागलेल्या महाभयंकर आगीची वेगवेगळी कारणे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत. यात आगीचे प्रमुख कारण गोदामांच्या देखभाल-दुरुस्तीचे समोर येत आहे. युद्धसामग्री ठेवण्याच्या गोदामाच्या अनेक इमारती कालबाह्य़ झाल्या आहेत. त्यांची डागडुजी करून काम केले जात आहे. त्यातून ही घटना घडली असावी, असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे.

गोदामांमध्ये विद्युत यंत्रणा नसल्याने तेथे वायरिंग नाही. आपत्कालीन स्थितीत रात्री काम करण्याची आवश्यकता भासल्यास विजेरीचा (टार्च) वापर केला जातो. यामुळे शार्टसर्किटचा प्रश्नच उद्भवत नाही.  ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमान सहन करण्याची गोदामात व्यवस्था असल्यामुळे ४४ अंश सेल्सिअसमध्ये आग लागण्याची शक्यता नाही, असे अधिकारी सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:12 am

Web Title: military officers discussion on pulgaon fire
Next Stories
1 निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा परिषद सदस्यांना टॅबलेट
2 उत्पन्नाचे बनावट दाखले देणाऱ्या पालकांविरुद्ध तक्रारीची मुभा
3 कागदावरील ‘बीट’ यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणार का?
Just Now!
X