18 February 2020

News Flash

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

आपल्या प्रेमाची  गावात वाच्यता व्हायला नको म्हणून नेहमी ते गावाबाहेर एकमेकांना भेटायचे.

 

प्रियकरासह जंगलात फरफटत नेले

नागपूर : प्रियकरासोबत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना कामठीमध्ये उघडकीस आली. नराधमांनी पीडितेला तिच्या प्रियकरासह रस्त्यावरून जंगलात फरफटत नेले व मारहाण केली. त्यानंतर मुलीवर आळीपाळीने बलात्कार करून त्यांना लुटण्यात आले. या घटनेने पुन्हा एका दिल्लीतील निर्भया, उत्तर प्रदेशातील कठुआ आणि हैदराबादमधील सामूहिक बलात्काराच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन आहे. शेख अनवर शेख अमीन (३२) रा. अब्दुल्ला शहा दग्र्याजवळ, कामठी असे मुख्य आरोपीचे नाव असून इतर आरोपींची नावे पोलिसांनी  गोपनीय ठेवली आहेत. पीडित  मुलगी व तिचा प्रियकर एकत्र शिकतात. आपल्या प्रेमाची  गावात वाच्यता व्हायला नको म्हणून नेहमी ते गावाबाहेर एकमेकांना भेटायचे. कळमना मार्गावरील लकी बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंटच्या मागील रस्त्यावर  बोलत उभे असताना शेख अनवर व त्याचे साथीदार तेथे पोहोचले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी दोघांनाही  मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना फरफटत बाजूच्या  जंगलात नेले. त्या ठिकाणी पीडित मुलीवर तिघांनीही बलात्कार केला. आरडाओरड करू नये म्हणून आरोपींनी दोघांचेही तोंड दाबून ठेवले होते. त्यानंतर पीडित मुलीच्या हातातील चांदीची अंगठी आणि मोबाईल हिसकावून पळून गेले. मुलगा व मुलगी कसेबसे आपला जीव वाचवून शहरात परतले व त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहाय्यक आयुक्त राजरत्न बन्सोड हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले. काही तासांतच नवीन कामठी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर एका आरोपीला गुन्हे शाखेच्या चमूने अटक केली.

भ्रमणध्वनीमुळे छडा लागला

बलात्कारानंतर आरोपी पीडित मुलीचा मोबाईल घेऊन पळून गेले. त्या आधारावर पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन शोधून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आरोपी अट्टल गुन्हेगार

अनवर शेख याच्याविरुद्ध यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.  दररोज सायंकाळी अंधार पडताच एका ऑटोतून आरोपी शहराबाहेर पडायचे. निर्जनस्थळी व रस्त्यावर एकटे सापडणाऱ्यांना पकडून ते नेहमीच लुटायचे, अशी माहिती समोर येत आहे. आरोपींवर तसे गुन्हेही दाखल आहेत.

First Published on January 23, 2020 12:27 am

Web Title: minor girl rape lover forest akp 94
Next Stories
1 नागनदी प्रदूषणमुक्त योजनेच्या समितीतून भाजप हद्दपार
2 नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचा ग्रामीण भागांस उपयोग काय?
3 ‘साहेबराव’ वाघावरील शस्त्रक्रियेचा प्रसिद्धीसाठी वापर!
Just Now!
X