महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्य नागपूर शाखेतर्फे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना घेराव घालण्यात आला. याचे नेतृत्व मध्य विभागाचे अध्यक्ष प्रशांत निकम यांनी केले. सध्या नागपूर शहरात गल्लोगल्ली सिमेन्ट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्यांच्या बांधकामांमध्ये गैरव्यवहार होत आहे. काम दिलेल्या अंदाजित खर्चाप्रमाणे होत नसून दर्जेदारही होत नाही. घरांच्या दारांच्या उंचीपेक्षा रस्ते वरच्या उंचीवर असल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दसरा रोड, महाल, प्रभाग क्र. ४१ , जुनी मंगळवारी, प्रभाग क्र. ३९ येथील रस्ते बोगस बांधकामातून बांधण्यात आले असून, त्याची तक्रार स्थानिक क्षेत्रीय कार्यालयात देऊनही कुठलाही कार्यवाही झालेली नाही. महापालिका आयुक्तांनी याप्रकणी त्वरित दखल घेऊन चौकशी करावी आणि बोगस बांधकाम कंत्राटदारांचे परवाने रद्द करावे असे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. याप्रसंगी घन:श्याम गिरडे, सुमित वानखेडे, राजेंद्र पुराणिक, नरेंद्र बांधेकर, शुभम उघाडे, शारीख शेख, महेश पिंपळीकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.