नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री घडलेल्या खुनाच्या घटनेतील आरोपी विकास उमेद नागोसे (२०) रा. गिड्डोबानगर यास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हिमांशू मनोहर डेंगे (२२) रा. अनमोलनगर असे मृताचे नाव आहे. हिमांशू हा खासगी काम करीत होता. त्याची विकास याच्यासोबत मैत्री होती. विकास हा हिमांशूच्या मानलेल्या बहिणीची छेड काढायचा. हिमांशू याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दीड महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले. त्या वादातून मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याने हिमांशूला दारू पाजली. त्यानंतर गंगा सेलिब्रेशन हॉलजवळ नेऊन दगडाने ठेचून त्याचा खून केला. त्यानंतर तो पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून बालाघाट परिसरातून अटक केली.