News Flash

खोटी माहिती दिल्याचे माहीत असूनही ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार

विद्यापीठ प्रकरणाची चौकशी करणार

विद्यापीठ प्रकरणाची चौकशी करणार

नागपूर : आदर्श प्राचार्य पुरस्कारासाठीच्या अर्जात वर्धा येथील बजाज विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओम महोदया यांनी खोटी माहिती दिली. याची माहिती कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना असूनही त्यांनी  कागदपत्रांची  पडताळणी न करता ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित केल्याची तक्रार वर्धा येथील महादेवराव शेंडे यांनी केली आहे. विद्यापीठ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.

महादेवराव शेंडे यांच्या आरोपामुळे विद्यापीठातील आदर्श प्राचार्य पुरस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनादेखील तक्रार करण्यात आली आहे. विद्यापीठात २६ जानेवारीला आदर्श पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक आणि प्राचार्याना सन्मानित केले गेले. त्यांच्या निवडीवर शेंडे यांनी आक्षेप घेतला आहे. पुरस्कारासाठी दावेदारी करत असताना त्यांनी चुकीची माहिती दिली. विद्यापीठाने त्याची पडताळणी न करताच  त्यांची निवड केली, असा आरोप शेंडे यांनी केला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी चौकशी केली जाईल, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:08 am

Web Title: nagpur university will investigate the matter of best principal award zws 70
Next Stories
1 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ व्यक्तींचा बळी
2 ‘एसआयएसी’ पूर्वतयारी प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह 
3 पालकांकडून उकळलेले दीड कोटी परत करा!
Just Now!
X