News Flash

.. तर अणेंच्या कानशिलात लगावू!

विदर्भाच्या मुद्दय़ावरून आमदार नितेश राणेंचा तोल गेला

.. तर अणेंच्या कानशिलात लगावू!
Nitesh Rane

विदर्भाच्या मुद्दय़ावरून आमदार नितेश राणेंचा तोल गेला

वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे आमदार नितेश राणे यांचा विदर्भाच्या मुद्यांवर बोलताना तोल सुटला. माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हे पुन्हा वेगळ्या विदर्भाबद्दल बोलल्यास त्यांच्या कानशिलात लगावू, असे ते म्हणाले. स्वाभिमान संघटनेच्या विदर्भातील एकमेव कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी अणे यांच्यावर चौफेर टीका केली.

मोदी लाट आणि आघाडी सरकारबद्दलचा राग यामुळे भाजपचे विदर्भात ४४ आमदार निवडून आले. ते स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यांवर निवडून आल्यास आम्ही त्यांच्या मिरवणुकीत सहभागी होऊ. पण, ज्यांना चार आणेंची किंमत नाही. त्या अणेंच्या तुणेतुणेला आम्ही भीक घालत नाही. अणेंनी आपले बघावे, असे ते म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 1:36 am

Web Title: nitesh rane comment on shrihari aney
Next Stories
1 लोकजागर :‘खड्डय़ा’त गेले राजकारण
2 गोशाळेच्या नावावर जागा हडपणाऱ्याला वेसण
3 ‘फॉम्र्युला वन’ स्पर्धा म्हणजे वेगासोबत मैत्री, भारतीयांना उधुवत करणार!
Just Now!
X