News Flash

रेमडेसिवीरच्या वाढीव पुरवठय़ासाठी गडकरींचे पुन्हा प्रयत्न

‘मायलन’ कंपनीचे चार हजार इंजेक्शन नागपुरात पोहोचले

‘मायलन’ कंपनीचे चार हजार इंजेक्शन नागपुरात पोहोचले

नागपूर : कोविडवरील उपचारासाठी उपयुक्त ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन/व्हिटारिस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. गडकरी यांच्या विनंतीवरून मायलन इंडियाने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत.

या इंजेक्शनची दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही रेमडेसिवीर इंजेक्शन  उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. यापूवी गडकरी यांनी ‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी रेमडेसिवीर पुरवठय़ाबाबत बोलणे केले होते. सन फार्मामार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोजेसचा पुरवठा नागपुरात झाला आहे आणि उर्वरित डोजेस लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा अवाजवी वापर होत असल्याने मोठय़ा प्रमाणात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बाजारातून इंजेक्शनची विक्री करण्याऐवजी थेट रुग्णालयांनाच पुरवठा करण्याचा पर्याय शोधला होता. त्यामुळे काळाबाजार कमी झाला. याच क्रमात गडकरी यांनी प्रयत्न करून उत्पादकांच्या   माध्यमातून इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. आता पुन्हा गडकरी यांनी नव्याने इंजेक्शन मिळण्यासाठी नवीन कं पन्यांशी चर्चा के ली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:36 am

Web Title: nitin gadkari s efforts for increase supply of remdesivir zws 70
Next Stories
1 …तर डॉक्टरांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई!
2 गृह विलगीकरणातील गंभीर करोनाग्रस्तांना रेमडेसिविर मिळणार कसे?
3 ‘बीएनएचएस’च्या संशोधकांकडून नव्या पक्षाची नोंद
Just Now!
X