News Flash

पोलीस हवालदाराला लाच घेताना अटक

जीवनलाल रंगनाथ मिश्रा (५४), असे आरोपीचे नाव असून तो राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

रजा मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी

प्रतिबंधक कार्यवाही टाळण्याकरिता लाच मागितली

राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीवर प्रतिबंधक कारवाई न करण्याकरिता ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रविवारी शिताफीने रंगेहात पकडले.

जीवनलाल रंगनाथ मिश्रा (५४), असे आरोपीचे नाव असून तो राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारकर्त्यांवर राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात ४०६, ४६८, ४१८ भादंवि गुन्हा दाखल होता. त्यावरून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ११० अन्वये प्रतिबंधक कार्यवाही न करण्याकरिता जीवनलाल मिश्रा यांनी तक्रारकर्त्यांला गाठून त्याला ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारकर्त्यांने लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दिली. या विभागाने तक्रारदात्यासोबत सापळा रचून रविवारी जीवनलाल मिश्रा यांना ५ हजार रुपये देण्याचे निश्चित केले. तक्रारकर्त्यांने मिश्रा यांना लाच देताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात पोलीस हवालदारावर राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भावना धुमाळे, आसाराम शेटे, चंद्रशेखर ढोक, चंद्रनाग ताकसांडे, प्रवीण पडोळे, मंजुषा बुंधाळे, संतोष मिश्रा यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 4:31 am

Web Title: police head constable arrested for taking bribe
Next Stories
1 भावनानुभूती विचारुनुभूतीत परावर्तीत व्हाव्यात
2 सिंचन घोटाळ्यात सहा जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र
3 ज्येष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार
Just Now!
X