शहरात घरगुती सिलेंडरचे दर ८४६ रुपयांवर;  सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले

नागपूर : फेबु्रवारी  हा घरगुती सिलेंडरच्या विक्रमी दरवाढीचा महिना ठरला आहे. या महिन्यात तब्बल तीनवेळा घरगुती सिलेंडरची दरवाढ झाली. सध्या शहरात घरगुती सिलेंडर ८४६ रुपयांवर गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधन दरवाढीसोबतच सिलेंडर दरवाढीचा दुहेरी सामना करावा लागत आहे.

एकीकडे इंधन दरवाढ होत असतानाच आता सिलेंडरच्या दरवाढीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.  चालू महिन्यात तब्बल तीन वेळा घरगुती सिलेंडरची दरवाढ झाली आहे. आधी ४ फेबुवारीला २५ रुपयांनी घरगुती सिलेंडरचे दर वाढले. त्यानंतर १५ फेबुवारीला थेट ५० रुपये व आता २५ फेबुवारीला पुन्हा २५ रुपयांनी सिलेंडरची दर वाढ झाली आहे. त्यामुळे ८४६  रुपय प्रतिसिलेंडर असा दर सध्या शहरात सुरू आहे.  करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसून करोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अनेक उद्योगांनाही टाळे लागले आहेत. अशात घरगुती सिलेंडर व इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक मोठ्या र्आिथक अडचणीत सापडले  आहेत. सिलेंडर विक्रेत्यांच्या मते, पुढील महिन्यात आणखी ६० रुपयांची दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे. सिलेंडरच्या दरवाढीमुळे ग्राहक आमच्या दुकानात आपला रोष व्यक्त करीत आहेत.

त्याचा वेगळा मन:स्ताप आम्हाला सहन करावा लागत आहे. मार्च-एप्रिल महिन्यात घरगुती सिलेंडर हजार रुपयावर जाण्याची शक्यता आहे, असेही या विक्रेत्यांनी सांगितले.