‘एम्स’च्या अहवालात मेडिकल, मेयोमधील त्रुटींवर बोट

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोनाशी संबंधित रुग्णांचे मेडिकल, मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये थेट वार्डात नमुने घेतले जात आहेत. त्यात कुणी बाधित निघाल्यास त्याच्या शेजारील खाटेवरील रुग्णालाही विषाणू संक्रमणाचा धोका आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) निरीक्षणातून ही त्रुटी पुढे आली.

दरम्यान, एम्सच्या चमूने संक्रमण टाळण्याबाबत मेडिकल, मेयोला बऱ्याच सूचना केल्या आहेत  तसा अहवाल  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सादर केला आहे. समितीने त्यावर दोन्ही रुग्णालयांना काही शिफारशी केल्या आहेत. यामध्ये रुग्णालयांत सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांसह लक्षणे नसलेल्या संशयितांची वेगवेगळी विभागणी करून दोन्ही गटांसाठी स्वतंत्र बाह्य़रुग्ण विभागात नमुने घेण्याची सोय असावी आदींचा समावेश आहे.   एम्सच्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर या शिफारशी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्य सूचनेवरून एम्सच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप जोशी आणि सामाजिक रोग प्रतिबंधकशास्त्र विभागाचे प्रमुख  प्रा. प्रदीप देशमुख यांनी हे निरीक्षण केले आहे.

रुग्णालयांतील सकारात्मक नोंदी

* सामान्य व अत्यवस्थ रुग्णांसाठी चांगली सुविधा

*  रुग्णालयांतील अतिरिक्त सोय वाढवण्याचे काम  प्रगतिपथावर

*  उपचाराबाबत मानक कार्य पद्धती (एसओपी) उपलब्ध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*  संशयित रुग्णांची स्वतंत्र  विभागणी व बाह्य़रुग्ण विभाग