30 May 2020

News Flash

सासऱ्यासोबत वादानंतर जावयाची आत्महत्या

आकाश हा पेट्रोल टँकरवर क्लिनर म्हणून काम करीत होता. त्याचे गेल्या दीड वर्षांपूर्वी लग्न झाले

(संग्रहित छायाचित्र)

गवळीपुरा येथील घटना

पैशावरून सासऱ्यासोबत वाद झाल्यानंतर ३० वर्षीय जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत मंगळवारी उघडकीस आली. आकाश सिद्धार्थ तागडे (३०) रा. गवळीपुरा, गिट्टीखदान असे मृताचे नाव आहे.

आकाश हा पेट्रोल टँकरवर क्लिनर म्हणून काम करीत होता. त्याचे गेल्या दीड वर्षांपूर्वी लग्न झाले. तो पत्नीसह गवळीपुऱ्यात राहात होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा सासऱ्यासोबत पैशाच्या कारणावरून वाद सुरू होता.

आकाश हा सोमवारी सायंकाळी वाडी येथे राहणाऱ्या सासऱ्याकडे गेला होता. तेव्हा सासऱ्यासोबत त्याचा वाद झाला. रागाच्या भरात तो रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी परतला. घरी पत्नीवर आरडाओरड करून तिला मारहाण केली. ‘तुझ्या वडिलांमुळे अशी वेळ आली’ असे वाक्य बोलून तो बेडरूममध्ये गेला आणि आतून दार लावून घेतले. काही वेळातच आकाशने पत्नीच्या ओढणीने गळफास घेऊ न आत्महत्या केली.

बराच वेळ झाल्यानंतर आकाशने दार उघडले नसल्याने त्याच्या वडिलांनी दार ठोठावले. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी विपरीत घडल्याचा संशय वडिलांना आला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले. गळफास घेतलेल्या अवस्थेत अडकलेल्या आकाशला खाली उतरवून मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2019 12:55 am

Web Title: suicide crime akp 94
Next Stories
1 चुकीच्या पदव्या देणाऱ्या जनसंवाद विभागावर कारवाई कधी?
2 दिवाळीच्या तोंडावर वाहन विक्रीत २५ टक्के घट!
3 तिवारी हत्याकांडातील आरोपीला ‘ट्रांझिट रिमांड’
Just Now!
X