यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. शुक्रवारी लग्नाचा मोठा मुहूर्त आहे. शिवाय तापमानही ४० अंशाच्या वर असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीसह अन्य पक्षांच्या उमेदवारांसमोर आहे.

पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाले. नागपूर, रामटेक, चंद्रपूर अशा शहरी भागात मतदानाचा टक्का घसरल्याने भाजप, शिवसेना महायुतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर गडचिरोली, अहेरीसारख्या दुर्गम भागात मतदानाचा टक्का वाढला. त्यामुळे वाढलेले मतदान महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडेल, या भीतीतून सत्ताधारी महायुतीच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणांबद्दल असलेला रोष पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत मतदानातून व्यक्त झाला. तीच परिस्थिती उद्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातही आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे संजय देशमुख रिंगणात आहेत. त्यामुळे येथे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशीच लढत आहे. कोण उमेदवार निवडून येईल, याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनाही अद्याप आलेला नाही. केवळ जातीय समिकरणे आणि तर्काच्या आधारे आपणच जिंकू असे दावे दोन्ही उमेदवारांकडून केले जात आहे.

“बंडखोरी नव्हे हा तर उठाव,” ब्रिजभूषण पाझारे २४ तासांनंतर अवतरले अन्…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Atul Save, chandrakant khaire
ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
halba community candidates in three constituencies in nagpur against bjp and congress
हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
division of votes in vidarbha constituencies
विदर्भात मतविभाजनासाठी ‘उदंड झाले अपक्ष’; ‘हरियाणा पॅटर्न’ची चर्चा
Anis Ahmed, Anis Ahmed Congress, Anis Ahmed latest news, Anis Ahmed marathi news,
अर्ज भरण्याची वेळ चुकवणारे अनिस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये

हेही वाचा…लोकसभा निवडणूक : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात १९ लाखांवर मतदार, २२२५ मतदान केंद्रांवर सज्जता

निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमदेवारांपुढे उद्या शुक्रवारी असलेले विवाह मुहूर्त आणि उन्हाचा वाढलेला पारा हे मोठे आव्हान आहे. राज्यात सुरू असलेली राजकीय चिखलफेकही मतदारांना रूचलेली नाही. शेतकरी पिकांना हमीभाव नसल्याने संतप्त आहे. गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा सुरू असून अवकाळी पावसामुळे नुकसान सुरू आहे, तर अनेक भागात पाणी, चाराटंचाईने डोके वर काढले आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान प्रशासनासोबतच राजकीय पक्षांपुढेही आहे. शहरी भागात मतदानाबाबात मतदारांमध्ये फार उत्सुकता नाही. तर ग्रामीण भागात उत्सुकता असली तरी सत्ताधारी पक्षांबाबत नाराजी आहे. त्यामुळे या परिस्थितीचा फटका महायुतीस बसण्याची शक्यता आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जेवढे जास्त मतदार मतदानासाठी बाहेर काढता येतील, तेवढी टक्केवारी वाढू शकते. दुपारी १२ ते ४ पर्यंत वाढत्या उन्हामुळे मतदार मतदानासाठी बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सकाळी ७ आणि सायंकाळी ४ वाजतानंतर मतदानासाठी नागरिक बाहेर पडतील याकडे पक्षांना बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. मतदानाचा टक्का घसरल्यास त्याचा फटका महायुतीला बसण्याची भीती या गोटात व्यक्त होत आहे.

हेही वाचा…अकोल्यात उमेदवारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; छुप्या प्रचारावर जोर

मतदान जनजागृतीसाठी सध्या प्रशासनासह विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था प्रयत्न करत आहेत. ज्येष्ठ, दिव्यांग, महिला मतदारांना विशेष सोयी दिल्या जात आहेत. युवा मतदारांमध्ये मतदानाचे महत्व पटवून दिले जात आहे. मात्र, राजकीय पक्षांकडून मतदानासाठी जनजागृती फारच कमी प्रमाणात होत आहे. आपले कार्यकर्ते ‘आपल्या मतदारांना’ मतदानासाठी घेवून येतीलच, या अविर्भावात राजकीय पक्ष आहेत. आता नागरिक राष्ट्रीय कर्तव्यास प्राधान्य देतात की, वैयक्तिक गरजा, पर्यटनात अडकून पडतात, हे उद्याच कळणार आहे.