भाजपच्या तत्कालीन मुंढे विरोधावर नागपूरकरांची टीका

नागपूर : तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात पाच कोविड के अर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतल्यावर तत्कालीन नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी  स्ट्रक्चरल ऑडिट न करता ते बांधकाम किं वा रुग्णालय सुरू करणे शासकीय निधीचा अपव्यय असल्याचा आरोप करत त्यास सभागृहात विरोध के ला होता. आता महापौर झाल्यानंतर त्याच के .टी. नगर येथे २० खाटांच्या रुग्णालयाचे उद््घाटन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. यासंदर्भातील चित्रफित व्हायरल झाली असून भाजपच्या दुटप्पी राजकारणावर टीका के ली जात आहे.

मुंढे यांनी करोनाच्या पहिल्या लाटेत पाच कोविड केअर सेंटर उघण्याची तयारी केली. यामध्ये आयसोलेशन दवाखाना, पाचपावली रुग्णालयाचा समावेश होता. त्यावेळी महापालिके तील सत्ताधारी भाजपने मुंढेंना घेरण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलावली. त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक  दयाशंकर तिवारी यांनी जोशात भाषण के ले होते. मुंढे यांनी डागडूजी आणि बांधकाम करून रुग्णालय उभारणे म्हणजे निधीचा दुरुपयोग आहे. आम्ही नागपूरचे नगरसेवक लोकसेवेचा  व्यवसाय करीत नाही.  नागपूरचे नगरसेवक सजग आहेत, असा दावा करून ३० वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट के ल्याशिवाय बांधकाम करणे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले होते. सत्ताधारी भाजपने करोनाची पहिली लाट सुरू असताना सलग पाच दिवस सर्वसाधारण सभा बोलावून मुंढे यांना काम करण्यास रोखण्याचा प्रयत्न के ला. आता तिवारींनी महापौर झाल्यावर आधी आक्षेप घेतलेल्या इमारतीमध्येच २० खाटांच्या  रुग्णालयाचे उद्घाटन के ले. प्राणवायू उपलब्ध झाल्यानंतर १०० खाटांपर्यंत रुग्णालयाची क्षमता वाढण्यात येईल, असेही उद्घाटनप्रसंगी तिवारी यांनी सांगितले. या उद्घाटनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाईन उपस्थित होते.