नमुने तपासणीकडे दुर्लक्ष

दिवाळीत मिठाईला मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने त्याचा गैरफायदा व्यापारी घेतात आणि भेसळयुक्त मिठाई ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. सणांमध्ये बाजारातील मिठाई शुद्ध खव्यापासूनच बनवलेली असेल याची शाश्वती नसते. अनेक हॉटेलमालक मिठाईत भेसळ करतात.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

सध्या बाजारात भेसळयुक्त मिठाईचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: दुधापासून बनलेल्या खव्याची मिठाई सर्वोत्तम असते. मात्र, खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ व रासायनिक पदार्थ वापरून भेसळयुक्त मिठाई बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आली आहे. बनावट खवा बनवणारे परप्रांतीय असल्याचे सांगितले जाते. मिठाई दुकानदार त्यांच्याकडून खवा विकत घेऊन  मिठाई तयार करतात. अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनही उघडय़ावरील अन्नाचे नमुने तपासले जात नाहीत. भेसळयुक्त मिठाईची तपासणी करून कारवाई करण्याबाबत हा विभाग उदासीन आहे. त्यामुळे बनावट खवा – मिठाई दुकानदारांचे फावते. सध्या शहरातील अनेक हॉटेलमध्ये असा भेसळीचा गोरखधंदा सुरू आहे. याची अन्न व औषध प्रशासन विभागाने दखल घ्यावी, असे आवाहन  ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, संघटक कल्पना उपाध्याय, सचिव लीलाधर लोहरे , जिल्हा अध्यक्ष प्रशांत चौधरी, संघटक रेखा भोंगाडे, दिलीप चौधरी, प्रशांत लांजेवार, अर्चना पांडे, छाया खांडेकर, श्रीराम सातपुते, रंजीता चापके, उज्ज्वला शहारे, श्रवणकर, कविता बोबडे यांनी केले आहे.

कशी ओळखाल भेसळयुक्त मिठाई?

  • मिठाई किंवा खवा तळहातावर घेऊन रगडा. तो जर कोरडा न होता तेलकट वास आला तर भेसळ समजावी.
  • मिठाईचा तुकडा तोंडात टाकताच तेलकट वाटला तर त्यात भेसळ असू शकते.
  • मिठाई व खव्यावर तीनचार आयोडिनचे दोन थेंब टाका. भेसळ नसल्यास त्यावर काहीच परिणाम होणार नाही. भेसळ असल्यास थेंबाची जागा काळसर होईल.
  • मिठाई व खव्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. मिठाईचा रंग जांभळा झाल्यास त्या मिठाईत मिटॅनिल हे रसायन वापरल्याचे सिद्ध होईल.
  • भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळात मळमळ, उलटी व जुलाब सुरू होतात.