राखी चव्हाण

hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

हवामान बदलाचे परिणाम केवळ भारतातच जाणवतात असे नाही तर विदेशातही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. मात्र, भारतात हे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे. हवामान जोखीम निर्देशांक २०२० नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले असून जागतिक पातळीवरील असुरक्षिततेच्या पायऱ्यांवर २०१७ मध्ये चौदाव्या क्रमांकावर असणारा भारत देश २०१८ साली पाचव्या क्रमांकावर आला आहे. हवामान बदलासाठी भारत हा देशात इतर देशांच्या तुलनेत जगात पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक असुरक्षित देश ठरला आहे.

हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. एवढेच नाही तर २०१८ मध्ये हवामान बदलामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीत भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. हवामान बदलामुळेच पावसाचे प्रमाणही वाढले आणि त्यामुळे दरडी कोसळून जवळजवळ एक हजार लोक मारले गेलेत. त्यातही भारत सर्वोच्च क्रमांकावर आहे. जर्मनीतील बॉन आणि बर्लिन ही एक स्वतंत्र विकास आणि पर्यावरणीय संस्था आहे जी शाश्वत जागतिक विकासासाठी काम करते. या संस्थेने हवामान बदलाबाबत केलेला अभ्यास धक्कादायक आहे. भारतात हवामान बदलामुळे असुरक्षितता वाढत आहे, कारण अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आणि भूस्खलन होत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम केरळ राज्यावर झाला आहे. गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक वाईट घटना म्हणून पुराचे वर्णन करण्यात आले आहे. इतके या पुराचे परिणाम भयानक आहेत. याशिवाय ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये भारताला दोन चक्रीवादळाचा तडाखा बसला होता, त्यात सुमारे एक हजार लोक मारले गेले होते.

मोठा आर्थिक फटका

हवामान बदलामुळे अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनच नाही तर तापमानावरही त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. या वाढत्या तापमानाचा फटका भारताला बसला. हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर म्हणजेच मानवी मृत्यूच्या संख्येवर सार्वजनिक उपाययोजनांच्या माध्यमातून नियंत्रण आणले गेले, पण आर्थिक नुकसान मात्र खूप मोठे झाले आहे. या एकूणच अभ्यासावरून असे दिसून येते की, हवामान बदलाशी निगडित अति हवामानाचा परिणाम म्यानमार आणि हैती यांसारख्या गरीब देशांवरच होत नाही, तर जगातील काही श्रीमंत देशांवरही त्याचा परिणाम होतो.  २०१८ मध्ये जपानला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसला. तर जर्मनी आणि कॅनडा हे देश अंतिम दहामध्ये म्हणजेच सर्वाधिक प्रभावित होते. उष्ण वाऱ्यांमुळेदेखील होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. हवामान बदलामुळे ते आणखी बिघडत चालल्याचेही या अभ्यासात नमूद आहे. हवामान बदलामुळे संपूर्ण जगात कायमस्वरूपी नुकसान होते. तरीही जमीन, संस्कृती आणि मानवी जीवनाचे नुकसान भरून काढण्यासाठी अद्याप कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अनेक औद्योगिक देशांनी यावर चर्चा करण्यासही नकार दिला आहे. दोन ते १३ डिसेंबपर्यंत माद्रिद येथे आयोजित परिषदेत हवामान बदलामुळे होणारा तोटा आणि नुकसानीबाबतचा अजेंडा ठेवण्यात आला. गरीब आणि असुरक्षित देशांसाठी ही परिषद अतिशय महत्त्वाची होती. गरीब देश हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कर्जावरच अवलंबून राहतील, ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असाही निष्कर्ष परिषदेत निघाला. हवामान जोखीम प्रकारात अंतिम २० असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, व्हिएतनाम, बांगलादेश आणि फ्रान्स हे अनुक्रमे बाराव्या, सहाव्या, सातव्या आणि १५व्या क्रमांकावर आहेत.