27 February 2021

News Flash

उमरेड अभयारण्यात वाघ मृतावस्थेत आढळला

या अभयारण्यातून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ‘जय’ या जगप्रसिद्ध वाघाचा तो बछडा होता. या परिसरात तो ‘चार्जर’ या नावाने ओळखला जात होता.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यातील चिचखेड बिटात रविवारी सकाळच्या सुमारास नर वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. सकाळच्या सुमारास पर्यटक सफारीवर असताना त्यांना वाघ मृतावस्थेत आढळला. या अभयारण्यातून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ‘जय’ या जगप्रसिद्ध वाघाचा तो बछडा होता. या परिसरात तो ‘चार्जर’ या नावाने ओळखला जात होता.

महिला पर्यटक असणारे एक वाहन सकाळी अभयारणत गेले. त्यानंतर इतर वाहने आत गेली. चिंचगाव बिटमधील कक्ष क्र. २१५ मध्ये महिला पर्यटकांचे वाहन गेले. तेव्हा वाघ त्यांना झोपलेला दिसून आला. त्या वाहनातील पर्यटक मार्गदर्शकाने दुसऱ्या वाहनाच्या पर्यटक मार्गदर्शकाला भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली. दुसरे वाहन १५ मिनिटात तेथे पोहोचले. या वाहनातील पर्यटक क्रांती रोकडे याला इतक्या वेळपासून वाघाची काहीच हालचाल होत नसल्याने संशय आला. त्याने कॅमेऱ्यातून पाहिले असता वाघाचे पोट फुगलेले दिसून आले. कान आणि शेपटीवर देखील सूज होती. पर्यटक उतरण्याचा प्रयत्न करत असल्यचे दिसताच क्रांती रोकडे यांनी सर्वांना थांबवले. पर्यटक मार्गदर्शकाला त्याने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितले. तपासणी नाक्यावरील महिला कर्मचाऱ्याला घटनेची महिती दिली.

थोड्यावेळातच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शंडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पर्यटकांची तिन्ही वाहने त्याठिकाणाहून परत पाठवण्यात आली. घटनेचा पंचनामा करून वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. वाघाच्या मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच कळू शकेल, असे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 9:51 pm

Web Title: tiger dead in umarkhed sanctuary
Next Stories
1 क्षुल्लक कारणावरून पालकांची शिक्षकाला मारहाण
2 ४० टक्के ज्येष्ठ नागरिक ऑनलाइन फसवणुकीचे बळी
3 न्यायालयातील सुरक्षा वाढवणार
Just Now!
X