News Flash

भंडाऱ्यात आढळले वाघाच्या बछड्यांचे मृतदेह; जवळच वाघिणीच्या पावलांच्या खुणा असल्याने शोध सुरु

भंडारा जवळील बेला येथे एक वाघाचे पगमार्क दिसून आले होते, त्यादिशने तपास सुरु

भंडाऱ्यात वाघाच्या दोन बछड्यांचे मृतदेह आढळले आहेत. भंडारा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील गराडा/बूज(पहेला) गावाजवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या विहिरीत मंगळवारी सकाळी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. मंगळवारी भंडारा जवळील बेला येथे एका वाघाचे पगमार्क दिसून आले होते. त्याचा आणि या वाघाच्या बछड्याचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.

पोलीस प्रशिक्षण घेत असताना नेहमीप्रमाणे सकाळी धावण्यास गेले असता तरुणांना वाघाचे दोन बछडे गराडा/बूज(पहेला) गावाजवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या विहिरीत मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ वनखात्याला याची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी वाजूरकर आणि कर्मचारी वर्ग घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बछड्याजवळ वाघिणीच्या पावलांच्या खुणा आढळून आल्या. वनखात्याची चमू वाघिणीचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 10:45 am

Web Title: two tiger cubs found dead in bhandara sgy 87
Next Stories
1 करोनायोद्धेच लसप्रतीक्षेत!
2 १६ रुग्णालयांत प्राणवायू प्रकल्पासाठी प्रयत्न
3 स्थानिकांच्या तुलनेत बाहेरच्या कंपन्यांची मदत अधिक
Just Now!
X