31 May 2020

News Flash

उमा भारती यांची सरसंघचालकांशी चर्चा

उमा भारती यांचे रविवारी सकाळी नागपूरमध्ये आगमन झाले.

केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारती यांनी रविवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. केंद्र सरकारच्या गंगा शुद्धीकरणासंदर्भात सुरू असलेल्या योजनेची माहिती त्यांनी डॉ. भागवत यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
उमा भारती यांचे रविवारी सकाळी नागपूरमध्ये आगमन झाले.त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी दोन तास चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर रविवारी उमा भारती पोहोचल्या. नागपूरला आल्यावर नेहमीच सरसंघचालकांची भेट घेते. गंगा शुद्धीकरणाबाबत त्यांनाही रुची आहे. त्यामुळे त्यांना या योजनेची माहिती असे उमा भारती यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी अन्य विषयांवर बोलणे टाळले.

गडकरींच्या निवासस्थानी जाणे टाळले
उमा भारती यांनी रविवारी सरसंघचालकांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. मात्र, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी सकाळी नागपुरात असताना त्यांनी वाडय़ावर जाणे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 12:14 am

Web Title: uma bharti discussion with rss head
Next Stories
1 गडचिरोली-नागपूर मार्गावर अपघात, एकाच कुटुंबातील ५ ठार
2 नागपुरातून भाजपचे गिरीश व्यास बिनविरोध
3 ‘अधिवेशनातून’ स्वच्छ भारत अभियान, कचरा आणि खणाखणी
Just Now!
X