20 September 2020

News Flash

गडकरींच्या ‘कोटय़धीश’ सुरक्षा रक्षकाचे पराक्रम उघड! 

गडकरींचा विश्वासू सुरक्षा रक्षक असल्याचे सर्वाना तो परिचित होता

नागपूर : शहर पोलीस दलातील एका सुरक्षारक्षकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत तैनात असताना कोटय़वधींची माया जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षा रक्षकाचे हे आर्थिक पराक्रम कळताच गडकरींनी त्याला आपल्या ताफ्यातून हटवल्याची माहिती समोर आली आहे.

१७ वर्षांआधी नागपूर शहर पोलीस दलातील राजेश नावाचा पोलीस शिपाई गडकरींच्या सुरक्षेत तैनात करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत तो त्यांच्याकडेच कामाला होता. गडकरींचा विश्वासू सुरक्षा रक्षक असल्याचे सर्वाना तो परिचित होता. या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने गडकरींकडे येणाऱ्या लोकांना त्यांची कामे करवून देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधींची संपत्ती जमवली. गेल्या काही वर्षांपूर्वी महाल येथील नटराज सिनेमागृहाची जागा विकत घेतली. आता त्या ठिकाणी  निवासी सदनिका उभारण्याची त्याची योजना आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका व्यावसायिकाचे काम करवून देण्यासाठी तीन कोटी रुपये घेतले. काम न झाल्याने व्यावसायिकाने गडकरींशी संपर्क साधला असता शिपायाचे बिंग फुटले. गडकरींनी इतरांच्या माध्यमातून त्याची माहिती गोळा केली असता त्याने १७ वर्षांत कोटय़वधींची माया जमवल्याचे समोर आले. यानंतर गडकरींनी त्याला संबंधिताचे तीन कोटी परत करण्यास सांगितले. पण, त्याने पैसे परत केले नाही. शेवटी गडकरींनी त्याची सेवा खंडित करून पुन्हा पोलीस मुख्यालयात पाठवले.

चौकशी करण्यात येईल

पोलिसांकडून असे उपद्व्याप अपेक्षित नाहीत. यासंदर्भात संबंधित पोलीस शिपायाची चौकशी करण्यात येईल. तो दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.

– गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, मुख्यालय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:11 am

Web Title: union minister nitin gadkari police security guard earn crores of rupees zws 70
Next Stories
1 ‘सर्वासाठी घर’ योजना तांत्रिक अडचणीत अडकली
2 महापौर-आयुक्तांकडून दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई
3 डॉ. गंटावारांकडून एलेक्सिस प्रकरणात तडजोडीचा प्रयत्न!
Just Now!
X