08 December 2019

News Flash

भरधाव ट्रकने तरुणीला चिरडले

पोलिसांनी गर्दी पांगवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

(संग्रहित छायाचित्र)

अपघातानंतर अमरावती मार्गावर तणाव; वेगवेगळ्या अपघातात तिघींचा मृत्यू

नागपूर : एका भरधाव ट्रकने मोपेडस्वार तरुणीला चिरडले. यात तरुणीचा मृत्यू झाला असून अपघातानंतर अमरावती मार्गावर वाडी परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पूजा ओमप्रकाश तिवारी (२६) रा. कृष्णानंद सोसायटी, नवनीतनगर, वाडी असे मृत तरुणीचे नाव आहे.

पूजा ही वाडी-हिंगणा मार्गावरील अजमेरा टायर्स येथे काम करीत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी १० वाजता ती मोपेडने कामावर जायला निघाली. दरम्यान, वाडी पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर भरधाव ट्रक वाहनांना ओलांडण्याच्या प्रयत्नात मोपेडला धडक दिली. त्यामुळे जमिनीवर कोसळून ती पाठीमागच्या चाकामध्ये सापडली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. तोपर्यंत ट्रकचालक हा पळून गेला. लोकांनी रस्त्यावर गर्दी करून रोष व्यक्त केला. पोलिसांनी गर्दी पांगवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.  तिचे वडील आयुध निर्माणीत नोकरीला आहेत, तर लहान भाऊ शिक्षण घेत आहे.

या व्यतिरिक्त सक्करदरा आणि शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. बिडीपेठ निवासी गरीमा ज्ञानवंत पाटील (४०) या रविवारी रात्री सक्करदरा तलाव परिसरातील बॉलिवूड सेंटर पॉईंटकडून भांडे प्लॉटकडे जात असताना अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला, तर सोमवारी सायंकाळी  वाजताच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या कामठी मार्गावर अज्ञात दुचाकी चालकाच्या धडकेत संघमित्रा धनराज शेंडे (५१) यांचा मृत्यू झाला.

First Published on April 24, 2019 4:15 am

Web Title: young girl dies after being hit by truck on amravati road
Just Now!
X