– देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षा २०२० ची अंतिम निकालाची अंतिम गुणवत्ता यादी मंगळवारी (३१ मे) जाहीर करण्यात आली. यात शेतकरी कुटुंबातील भंडारा जिल्ह्याच्या स्नेहल रामटेके या विद्यार्थ्याची उपशिक्षण अधिकारी पदावर निवड झाली. स्नेहल ग्रामीण भागातील भिलेवाडा (तालुका, जिल्हा – भंडारा) येथील आहे.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

स्नेहलचे वडील शेतकरी असून आई अंगणवाडीमध्ये मदतनीस आहे. त्याच्या या यशाने गावामध्ये आनंदाचे वातावरण असून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मार्च २०२१ मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर डिसेंबरमध्ये २ हजार ८६३ उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसिलदार अशा वर्ग १ च्या पदांसाठी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत पात्र झालेल्या ५९७ उमेदवारांची १८ ते २९ एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन दोन तासात अंतिम निकालाची सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात आली. या परिक्षेत प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम, तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक पटकावला. ऑप्टिंग आऊटच्या प्रक्रियेनंतर शिफारसपत्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली.

या परीक्षेत स्नेहल रामटेके या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. स्नेहल लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. त्याने दहावी आणि बारावी परीक्षेतही गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले होते. २०१५ मध्ये स्नेहल बारावीमध्ये भंडारा जिल्ह्यातून पहिला आला होतो. त्यानंतर त्याने एमआयटीमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. मात्र, अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही शासकीय सेवा करायची या भावनेने त्याला स्वस्थ बसू दिलं नाही.

हेही वाचा : ‘एमपीएससी’च्या दुखण्यामागचा रोग…

स्नेहलने एमपीएससी करायचा निर्णय घेतला.२०१९ पासून या परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला. एक शेतकरी परिवारातील विद्यार्थी एमपीएससीसारखी काठिण्य पातळी असलेली परीक्षा पाहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करू शकल्याने त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. लोकसत्ताशी बोलताना स्नेहल म्हणाला की, इतक्यात हा प्रवास थांबणारा नसून पुढे त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची आहे.