औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या तीव्र आहे. या जिल्ह्यात १ लाख १९ हजार ३४५ नोंदणीकृत बेरोजगार आहेत. यामध्ये अभियंता, वकील, एमबीए, पदव्युत्तर, पदवी, आयटीआय, वैद्यकीय क्षेत्र, तांत्रिक तथा अन्य बेरोजगार युवकांना समावेश आहे.

पदवी पदव्युतर शिक्षण पूर्ण करून शासकीय नोकरी मिळविण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी कौशल्य विकास विभागाकडे पदवीधारक (आर्ट्स, कार्मस, सायन्स)रोजगारांसाठी नोंदणीही करतात. मात्र, नोकरीसाठी उपलब्ध जागेच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अनेकांचे पदव्युतर शिक्षण पूर्ण करूनही नोकरीचे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेक जण रोजगारविषयक अभ्यासक्रमही पूर्ण करतात.

हेही वाचा >>>चंद्रपूर: टॅब वाटप, एकाच वेळी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने गोंधळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, कौशल्य नसल्याने त्यांनाही रोजगारांपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात १ लाख १९ हजार ३४५ बेरोजगारांची नोंद आहे. कंपन्यांना कुशल कामगार मिळेनात अशी वास्तविकता आहे. विविध कंपनीत कुशल कामगारांना संधी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, अनेकांकडे कौशल्याचा अभाव आहे. त्यामुळे कुशल कामगार मिळविताना कंपन्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे रोजगार मेळावे आयोजित केले जातात. शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या संकेतस्थळावर रोजगारविषयक माहिती उपलब्ध होते. जिल्ह्यात उच्च विद्याविभूषितांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. यातील बहुतांश उमेदवारांकडे कौशल्याचा अभाव आहे. त्यामुळे शिक्षण होऊनही अनेकांना रोजगार मिळत नसल्याचे चित्र आहे.