नागपूर : उपराजधानीत नायलॉन मांजामुळे आणखी एक बळी गेला. वडिलासोबत दुचाकीने बाजारात जाणाऱ्या १० वर्षीय चिमुकल्याचा नायलॉन मांजाने गळा कापून मृत्यू झाला. वेद क्रिष्णा शाहू (जरीपटका) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी धंतोलीत ध्रूव ऊर्फ वंश प्रवीण धुर्वे (रा. कुंभार टोळी वस्ती, धंतोली) या मुलाचा पतंगाच्या मागे धावल्याने रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी क्रिष्णा शाहू हे मुलगा वेदसोबत दुचाकीने बाजारात जात होते. दरम्यान हवेतून आलेला मांजा वेदच्या गळ्याला गुंडाळला गेला. दुचाकी वेगात असल्यामुळे वेदचा गळा बराच चिरला गेला. वेदने आरोळी ठोकताच त्याच्या वडिलाच्या लक्षात आले. त्यांनी लगेच वेदला मानकापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी वेदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा – चंद्रपूर : पुरुषांना नसबंदी नकोच! महिलांनाच पुढे करण्यात येते

हेही वाचा – खळबळजनक! ४० हजारांमध्ये ५ लाखांच्या नकली नोटांची विक्री…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकरसंक्रातीच्या दिवशीच नायलॉन मांजामुळे वेदचा बळी गेला. वेदच्या मृत्यूमुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.