लोकसत्ता ऑनलाइन, वर्धा

वर्ध्यात ११ फुटाच्या अजगराने निलगायीच्या बछड्याला गिळल्याची घटना समोर आली आहे. आर्वी तालुक्यातील भाईपुर येथे ही घटना घडली. निलगायीचं बछडं गिळल्याने गलितगात्र झालेल्या या अजगराची सुटका करण्यात सर्पमित्राला यश मिळालं आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वर्ध्यात ११ फुटाच्या अजगराने निलगायीचं बछडं गिळल्याची घटना समोर आली आहे. आर्वी तालुक्यातील भाईपुर येथे ही घटना घडली. निलगायीचं बछडं गिळल्याने गलितगात्र झालेल्या या अजगराची सुटका करण्यात सर्पमित्राला यश मिळालं आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भाईपुर येथील प्रवीण सावंत यांच्या शेतात ११ फुटांचा अजगर आला होता. माहिती मिळताच प्रवीण सावंत काही सर्पमित्रांना घेऊन शेतावर पोहचले. तिथे पोहोचून पाहिलं असता निलगायीचं बछडं गिळून अजगर सुस्तावल्याचे दिसून आले. मात्र शिकार असह्य झालेल्या अजगराने ते बछडं बाहेर फेकणे सुरू केले होते. अखेर पोटातून बाहेर पडल्यावर अजगर सुस्त पडला. त्यावेळी तिथे उपस्थित सर्पमित्रांनी त्याची सुटका करत पोत्यात बंदिस्त केलं.

वर्धा येथील पिपल्स फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रम या कार्यालयात अजगरास नेण्यात आलं . डॉ संदीप जोगे यांनी अजगरावर उपचार केले असून वनविभागाला याची माहिती देण्यात आली आहे.