नागपूर: वनरक्षक होण्याचे आणि सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. थेट वनरक्षकांची १२५६ पदे भरली जाणार आहेत. ही एकाप्रकारची मेगा भरतीच आहे. ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला असून सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दशक्रियेचे आमंत्रण, संत्री उत्‍पादक शेतकऱ्याने केली होती आत्‍महत्‍या

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी

हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठोपाठ अजित पवार यांचेही नागपुरात कार्यालय सुरू

ही भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून खोळंबली होती. मात्र, आता यामधून मार्ग काढत उमेदवारांना मोठा दिलासा देण्यात आला. एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टीसीएस आयओएनमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली. त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. शेवटी यामधून मार्ग निघाला असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित १२५६ वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.