नागपूर : शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट २०२३सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियापध्दतीने करण्यांत येत आहे. यावर्षी एकूण ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५७४अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे ९५,३८०  व ५९०१२ अशा एकूण १,५४,३९२ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ८३ असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.

हेही वाचा >>> नागपुरात विदर्भातील तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती, कधी, कुठे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३ या वर्षापासून नव्याने २५७ तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये ५१४०एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने ३० तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.