scorecardresearch

चंद्रपुरात २० वर्षीय तरुणाची हत्या, धारदार शस्त्राने वार करत हल्लेखोर फरार

बुधवारी सकाळी धर्मवीर अशोक यादव (२०) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली

Murder, Chandrapur,
बुधवारी सकाळी धर्मवीर अशोक यादव (२०) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली (प्रातिनिधिक फोटो)

चंद्रपूरमध्ये एका २० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बायपास मार्गावरील अस्टभुजा प्रभागात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धर्मवीर अशोक यादव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत.

बुधवारी सकाळी धर्मवीर अशोक यादव (२०) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हत्या करणारे अनोळखी इसम हल्ल्यानंतर फरार झाले आहेत. हत्येची माहिती मिळताच रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध सुरू आहे .

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 20 year old youngster murdered in chandrapur sgy