नागपूर : भारतीय स्टेट बँकेची गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरातील १२ हजार ६७१ प्रकरणांमध्ये २१ हजार ९१५ कोटी ५ लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक फसवणुकीची प्रकरणे ही २०२०-२१ या आर्थिक वर्षातील आहेत.

देशातील नावाजलेल्या सरकारी बँकांपैकी एक म्हणून भारतीय स्टेट बँकेची ख्याती आहे. बँकेमध्ये २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५ हजार ७२४ प्रकरणांमध्ये १० हजार ८१ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाली. २०२१-२२ मध्ये ४ हजार १९२ प्रकरणांत ७ हजार ३६ कोटी ४० लाख रुपयांच्या फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आली. २०२२-२३ मध्ये २ हजार ७५५ प्रकरणांमध्ये ४ हजार ७९७ कोटी ५१ लाख रुपयांची फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आली.

हेही वाचा – “फडणवीस यांच्याविरोधात कोणी लढण्यास तयार नव्हते, तेव्हा…” आशीष देशमुख काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात हा तपशील पुढे आणला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करून घेतलेले कर्ज, सायबर फसवणूक, एटीएम अशा सगळ्याच पद्धतीच्या फसवणुकीचा यात समावेश आहे.