अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : पोलीस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयाच्या समन्वयातील अभावामुळे राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नीच्या प्रक्रियेला खिळ बसली होती. मात्र, मॅटमध्ये जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे अखेर राज्यभरातील २८० पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात ‘लोकसत्ता’ने वारंवार पाठपुरवठा केला होता, हे विशेष.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Farmers will get the amount of difference of cotton and soybeans says devendra fadnavis
फडणवीस निवडणूक सभेत म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्कम…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका

हेही वाचा >>> न्यायदानासाठी रात्री नऊ वाजता उघडले न्यायालयाचे दार, प्रकरण काय? वाचा…

राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून पात्र असतानाही पदोन्नती देण्यात येत नव्हती. सहायक पोलीस निरीक्षकांच्या १०२ क्रमांकाच्या तुकडीतील जवळपास ५० टक्के पोलीस अधिकाऱ्यांना महासंचालक कार्यालयाने घातलेल्या गोंधळाचा फटका बसला. या तुकडीतील अर्धेअधिक अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून ते अधिकारी ठाणेदार म्हणून काम करीत होते. मात्र, त्यांचेच ‘बॅचमेट’ कनिष्ठ अधिकारी म्हणून हाताखाली काम करीत होते. हा सर्व गोंधळ गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गाने करून ठेवला होता. शेवटी काही अधिकाऱ्यांना मॅटमध्ये धाव घ्यावी लागली होती. अखेर पोलीस महासंचालक कार्यालयाने काही चुकांची दुरुस्ती करीत १०२ तुकडीतील सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश काढले. शुक्रवारी १६८ अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीची यादी जाहिर करण्यात आली. त्यामुळे पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा >>> आफ्रिकन चिता ‘गामिनी’चा भारतात विश्वविक्रमच! पाच नाही तर सहा बछड्यांना दिला जन्म

मात्र, याच तुकडीतील ५१ अधिकाऱ्यांना आरक्षणाचा लाभ घेतल्याचा ठपका ठेवत अद्यापही पदोन्नती देण्यात आली नाही. त्या अधिकाऱ्यांना आरक्षणातून नव्हे तर किमान कालनियतमानाने तरी पदोन्नतीची मागणी रेटून धरली आहे. पदोन्नती संदर्भात निर्णय घेण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांत अजुनही नाराजीचा सूर आहे.

तुकडी क्र.१०३ चे भविष्य अधांतरी

राज्यातील १०३ तुकडातील अधिकाऱ्यांनासुद्धा पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळण्याची अपेक्षा होती. ‘मॅट’ आणि उच्च न्यायालयानेही त्यांच्या पदोन्नतीसाठी सकारात्मकता दाखवली होती. मात्र, महासंचालक कार्यालयातून अद्याप कोणत्याही हालचाली नसल्यामुळे त्या अधिकाऱ्यांचे भविष्य अधांतरी असल्याचे बोलले जाते.

११२ अधिकारी झाले सहायक निरीक्षक

राज्यातील ११२ पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. यामध्ये क्र. १११ तुकडीतील २७ जणांचा समावेश आहे. तर उर्वरित ११० तुकडीपर्यंतच्या पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. क्र. १११ तुकडीतील अधिकारीसुद्धा गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नतीस पात्र आहेत. परंतु, पदोन्नतीच्या संथ प्रक्रियेचा त्यांनाही फटका बसला आहे.