scorecardresearch

Premium

गोंदिया जिल्ह्यातील ४३ जलाशये तुडुंब, पण गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमीच

गेल्या वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील काही जलाशये पूर्णपणे तुडुंब होत आहेत. यंदाही ४३ जलाशये तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. तर ७ जलाशयांमध्ये ९० टक्क्यांवर जलसाठा झाला आहे.

reservoirs in Gondia district
गोंदिया जिल्ह्यातील ४३ जलाशये तुडुंब, पण गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमीच (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

गोंदिया : गेल्या वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील काही जलाशये पूर्णपणे तुडुंब होत आहेत. यंदाही ४३ जलाशये तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. तर ७ जलाशयांमध्ये ९० टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रबी हंगामात सिंचनासाठी पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एकीकडे सलग पावसामुळे कमी कालावधीच्या हलक्या धानाला फटका बसला आहे, तर दुसरीकडे प्रकल्पांना मात्र याचा फायदा झाला आहे.

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात लहान-मोठे जवळपास ८० प्रकल्प आहेत. राज्य शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत ७० प्रकल्प व तलावांचा समावेश आहे. ५ मध्यम, १४ लघु आणि २० माजी मालगुजारी तलाव शंभर टक्के भरले आहेत. एक मध्यम, तीन लघु प्रकल्प व तीन माजी मालगुजारी तलावांत ९० टक्क्यांवर जलसाठा आहे. बोदलकसा, चोरखमारा, रेंगेपार, कटंगी, कलपाथरी या मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के साठा आहे. डोंगरगाव, कालीमाती, मोगर्रा, नवेगावबांध, पिपरिया, सडेपार, उमरझरी, बेवारटोला, भुराटोला हे लघु प्रकल्पही शंभर टक्के भरले आहे. ३८ जुन्या मालगुजारी तलावांपैकी २० तलाव शंभर टक्के भरले असून ते ओसंडून वाहू लागले आहेत.

Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल
Aap protests in front of Nashik mnc
नाशिक : ‘आप’चे मनपासमोर बोंबाबोंब आंदोलन
girlfriend boyfriend dead Pardi
वर्धा : १५ दिवसांपासून बेपत्ता प्रेमीयुगुल मृतावस्थेत आढळले, दोघांनी पायाला ओढणी बांधून…
maharashtra face drinking water crisis
राज्यात ५५१ टँकरनी पाणीपुरवठा; गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीषण चित्र, दीड हजार गावांमध्ये टंचाई

हेही वाचा – चंद्रपूर : ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह चौघांवर गुन्हे दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

मध्यम प्रकल्प चुलबंद ७४.३० टक्के, खैरबंदा ८६.९१ टक्के, मानगड लघु प्रकल्पात ८७.८३ टक्के साठा झाला आहे. आजपर्यंत ९ मध्यम प्रकल्पांत ९१. ७७ टक्के, २३ लघु प्रकल्पांत ८९.३६ टक्के आणि ३८ माजी मालगुजारी तलावांत ९१.११ टक्के याप्रमाणे ७० प्रकल्पांत ९०.७२ टक्के पाणीसाठा आहे.

हेही वाचा – नागपूर : रेल्वेचे करंट तिकीट कुठून घ्यायचे?

गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमी

गतवर्षी याच तारखेपर्यंत मध्यम प्रकल्पांमध्ये ९७.९३ टक्के, लघु प्रकल्पांमध्ये ९९.७८ टक्के, मामा तलावांत ९९.३२ टक्के असा एकूण ९८.८४ टक्के जलसाठा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेत ८.१२ टक्के पाणीसाठा कमीच आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 43 reservoirs in gondia district full of water sar 75 ssb

First published on: 04-10-2023 at 13:35 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×