ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका शेतमजूराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, १४ जून रोजी सकाळी उघडकीस आली. देविदास कामडी (४८) असे मृत शेतमजुराचे नाव असून ते जंगलात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच म्हणजे १२ जून रोजी हळदा गावातच राजेंद्र कामडी या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच ही घटना घडल्याने गावकरी भयभीत आहेत.

या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.