अकोला : कर्जफेडीच्या विवंचनेतून अकोट तालुक्यातील उमरा येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. शैलेंद्र चंद्रशेखर तोमर (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा – ‘सलोखा’ वाढतोय, कशामुळे? जाणून घ्या!

दोन वर्षांपासून संत्रा पिकांचे अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्याची विवंचना होती. त्यातच त्यांनी शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या महिन्यात उसनवारी पैसे घेऊन त्यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे पीक कर्ज भरले होते. आता या खरीप हंगामासाठी त्यांनी पुन्हा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे पीक कर्ज घेतले होते. आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, भाऊ, सुना असा आप्त परिवार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.