नागपूर : छिंदवाड्यातील अशिक्षीत कुटुंबात जन्मलेली मुलगी पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत होती. प्रकृती खालवल्यावर तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात हलवले गेले. तिचा मेंदूमृत असल्याचे पुढे आल्यावर कुटुंबियांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. या अवयवांचे इतर रुग्णांत प्रत्यारोपणाने पाच कुटुंबात प्रकाशाची पेरणी झाली.

राणी (बदललेले नाव) असे २३ वर्षीय मुलीचे नाव आहे. ती मुळात छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. तिचे आई- वडील अशिक्षित आहे. तर तिला लहान भाऊ आहे. आई- वडील शेतमजूर असले तरी त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचे ठरवले होते. त्यानुसार राणी बीएच्या अंतिम वर्षाला शिकत होती. मुलीची प्रकृती अचानक खालवली. तिला कुटुंबियांनी उपचारासाठी नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

मेडिकलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तब्बल नऊ दिवस परीश्रम घेतल्यावरही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शेवटी मुलीची विविध तपासणी केली असता तिचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. ही माहिती कळल्यावर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून मुलीच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले गेले. अवयवदानातून इतर कुटुंबियांच्या घरात प्रकाश पडणे शक्य असल्याचे समजावण्यात आले. त्यानंतर कुटुंबियांनी धाडसी निर्णय घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयातील प्रतिक्षा यादीतील एका ३३ वर्षीय महिलेला एक मुत्रपिंड, व्होकार्ट रुग्णालयातील दुसऱ्या एका ५५ वर्षीय पुरुषात दुसरे मुत्रपिंड, व्होकार्ट रुग्णालयातील एका ६५ वर्षीय पुरुषामध्ये एक यकृत प्रत्यारोपीत केले गेले. तर दोन्ही बुब्बुश मेडिकलच्या नेत्रपेढीला दिले गेले आहे.

हेही वाचा – “काँग्रेस बाबासाहेबांप्रमाणे बाळासाहेबांनाही निवडून येऊ देत नाही”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

हेही वाचा – आमदार बच्‍चू कडूंचा भाजपला जाहीर सभेत इशारा; म्हणाले, “तुरुंगात टाकले, तरी बेहत्‍तर…”

ते दोन रुग्णांमध्ये प्रत्यारोपीत होणार असून त्याने दोघेही हे सुंदर जग बघू शकणार आहे. या यशस्वी उपक्रमासाठी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहूल सक्सेना, समन्वयक दिनेश मंडपेसह मेडिकल, सुपरस्पेशालीटी, व्होकार्ड रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय चमूची भूमिका महत्वाची होती.