अमरावती: अमरावती कार्यालयात प्रतिनियुक्‍तीवर बदली हवी असलेल्‍या एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. तक्रारीच्‍या आधारे पोलिसांनी मारोतराव राठोड (रा. खामगाव) या शासकीय अधिकाऱ्याविरोधात विनयभंग व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला.

फिर्यादी कर्मचारी महिलेला प्रतिनियुक्तीवर अमरावती कार्यालयात बदली हवी होती. त्यामुळे त्यांनी १८ ऑक्टोबर रोजी आपल्या सहआयुक्तांच्या सुचनेनुसार सहकर्मचाऱ्यांसह आरोपी मारोतराव राठोड याच्या कक्षात जावून त्याला प्रतिनियुक्तीबाबत विनंती केली. त्यावेळी राठोड फारसा काही बोलला नाही. मात्र त्यानंतर त्याने ‘डोंट वरी डार्लिंग, आय नो यू आर माय डार्लिंग, तू खुप सुंदर आहेस, तू अमरावतीला कुठे राहतेस, मी गाडगेनगरला राहतो’, असा व्हॉटसॲप संदेश त्या महिलेला पाठवला. त्यांचा सतत पाठलाग करुन आरोपी मारोतराव राठोड याने शारीरिक संबंधाची मागणी केली.

हेही वाचा… शासकीय निधीतून राजकीय कार्यक्रमाचा डाव! स्पर्धा होणार गोंदियात मात्र बक्षीस वितरण गोरेगावात; नेमका काय आहे प्रकार? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीने वारंवार डार्लिंग हा शब्द वापरुन संदेश पाठवले. कर्मचारी महिलेने त्याने पाठविलेल्या व्हिडिओचे स्क्रिनशॉट देखील काढून ठेवले. मारोतराव राठोडच्या अशा विकृत वर्तनाची महिलेने त्यांच्या कार्यालयातील विशाखा समितीकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर महिलेने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान तो प्रकार घडल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.