A fight between two tigers in Tadoba-Andhari Tiger Reserve nagpur | Loksatta

अखेर “तारू” “बजरंगा”वर भारी पडला…

काही दिवसांपूर्वी “छोटी मधु” या वाघिणीचे मन जिंकण्यासाठी व अधिवासासाठी “पारस” व “तारु” या दोन वाघांमध्ये जुंपली होती.

fight between two tigers
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अधिवासासाठी दोन वाघांची झूंज

वारसा हक्कासाठी सख्खी भावंडं एकमेकांशी भांडताना आपण कित्येकदा पाहिली आहेत, पण प्राण्यांच्याही बाबतीत हे होत असेल का! त्यांच्यातही भांडणं होतात. अगदी माणसासारखी. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतच नाही तर अगदी एकमेकांच्या मानगुटीवर बसण्यापर्यंत. मात्र, त्यांची ही भांडणं होतात ती अधिवासासाठी.

हेही वाचा- “आत्मदहन करू द्या, अथवा खुशाल गोळ्या घाला”, शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक, ११ फेब्रुवारीला आत्मदहनाचा निर्णय

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात हे चित्र दररोज बघायला मिळते. येथे कित्येकदा अधिवासाच्या, अस्तित्वाच्या, वाघिणीवर हक्क दाखवण्यासाठी लढाईत एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत वाघाची मजल गेली आहे. नुकतेच “तारू” आणि “बजरंग” या दोन वाघांमध्ये अस्तित्वासाठी, अधिवासासाठी अटीतटीची लढाई झाली. काही दिवसांपूर्वी “छोटी मधु” या वाघिणीचे मन जिंकण्यासाठी व अधिवासासाठी “पारस” व “तारु” या दोन वाघांमध्ये जुंपली होती. तर धिप्पाड शरीरयष्टीच्या “बजरंगा”ने बाहेरून येत ताडोबात आपले अस्तित्व निर्माण केले. अगदी वाघिणीसाठी त्यांच्या बछड्यांचाही बळी घेतला. मात्र, आगरझरी वनक्षेत्रात झालेल्या युद्धात “तारू” “बजरंग” वर भारी पडला आणि त्याने बजरंगाला हाकलून लावले. या तुंबळ युद्धात शेवटी “तारू” विजयी ठरला. वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार राहूल कूचनकर यांनी दोन वाघांमधील ही लढाई त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:04 IST
Next Story
वर्धा : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानपिचक्या; भाजप नेत्यांना आले भान, मगच मांडव भरला छान