ब्रम्हपुरी तालुक्यातील सिंदेवाही – मेंडकी मार्गावरील किटाळी (बोद्रा) गावातील एका विहिरित बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी, ४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून जीवनदान देण्यात आले. शिकारीसाठी पाठलाग करताना बिबट विहिरीत पडल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>>वर्धा: आयुर्वेद महाविद्यालयातील पदे भरण्याचा शासनाचा आदेश; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
pune crime news, son beats mother pune marathi news,
मुलाकडून आईला बेदम मारहाण… घर नावावर करून देत नसल्याने डोक्यात मारली खूर्ची

सविस्तर वृत्त असे की, ब्रम्हपुरी तालुक्यातील चारही बाजूने घनदाट अरण्याने व्याप्त असलेल्या किटाळी (बोद्रा) गावातील संतोष मेश्राम यांच्या घराजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. विहिरीमध्ये बिबट्याच्या डरकाळीचा आवाज परिसरातील लोकांना ऐकू आला. कशाचा आवाज आहे म्हणून विहिरीजवळ जाऊन बघितले तर विहिरीत बिबट्या पडलेला होता. ही माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली. वनविभागाला माहिती होताच त्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. तब्बल दोन ते तीन तासानंतर बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.