ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला वर्धा मार्गावरील बी.आर.ए. मुंडले हायस्कूलच्या सुमारे ११०० विद्यार्थ्यांसोबत ५ हजार किलोंची भाजी तयार करणार असल्याचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आणखी एक नवा विक्रम करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे ते म्हणाले. यावेळी ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे उपस्थित होते.

हेही वाचा >>>नागपूर: विकृत व्यवस्थापक महिला सुरक्षारक्षकाला म्हणाला, ‘तुला नोकरी करायची असेल तर…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘समरसता भाजी’ असे नाव याला देण्यात आले आहे. भाजी निवडणे, चिरणे आणि स्वच्छ करणे ही कामे मुले करणार आहे. तर भल्या मोठ्या कढईत फोडणी देण्याचे काम विष्णू मनोहर करणार आहेत. विशेष म्हणजे, मुले पण आपल्या घरून भाजी आणणार आहे. हा १५ वा विश्व विक्रम राहाणार असल्याचे मनोहर यांनी सांगितले. चिरलेली भाजी पाण्यात ठेवली तर खराब होत नाही. म्हणून शनिवार २४ रोजी मुले भाजी चिरून, कापून ठेवणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजतापासून प्रत्यक्ष भाजी तयार करण्याला सुरुवात होईल. तयार करण्यात आलेली भाजी सहभागी विद्यार्थी आणि त्यांच्या परिवाराला दिली जाणार आहे.