वर्धा : देवळी तालुक्यातील पाथरी येथे अंगणवाडीच्या नवीन बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या घटनेने पाथरी या गावावर शोककळा पसरली आहे. सार्थक बाळकृष्ण घोडाम असे मृत बालकाचे नाव असून तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी येथील वर्ग तिसरीमध्ये शिकत होता.

रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत तो घरी न आल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. जिल्हा परिषद शाळेजवळ अंगणवाडी इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ त्याचा जोडा आढळून आला. मुसळधार पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी भरले होते. तेथे शोध घेतला असता सार्थकचा मृतदेह आढळून आला.